


संत तुकाविप्र महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील एक महान सत्पुरुष होते.तुकाविप्र महाराज यांचा काळ हा शके १६५० ते शके १७१४ म्हणजेच इसवी सन १७२८ ते इसवी सन १७९२ हा होता . हा काळ उत्तर पेशवाई म्हणून ओळखला जातो. तुकाविप्र महाराज हे आपला जन्म कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी असे मानत असत हे त्यांच्या अनेक अभंगातून लक्षात येते. तसेच भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ही त्यांच्या अभंगातून जाणवते.तुकाविप्र महाराज हे वारकरी पंथाचे होते . पंढरपूरची वारी करीत भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला.
एकनाथ कृपे | अनंत वैष्णव | नाम नित्योत्सव | हरी गुरु प्रसाद
एकनिष्ठ तप | सह्याद्रीचे तळी | कृष्णेचिया जळी | वेदवती संगम
तुकाविप्र तया | कुळिचा प्रसाद | कीर्तन आनंद | हरी गुरु स्मरण
अनंत कृपेनी | विठ्ठल कीर्तनी | सह्याद्री भुवनी | कृष्णेचिया तटाकी
पुर्वपार व्रत | चालतची आले | नाथ विठ्ठले | नित्यनेमे चालले
तुकाविप्र नातू | विठ्ठल संताचा | अनादि बळीचा | नाम कथा हा धिंग
विठ्ठल प्रसादे | विप्रनाथे मोठी | केली हातवटी | संकीर्तन निर्मळ
विप्रनाथ स्वामी | पितर आपुले | प्रसन्न जाहले | बाळपणी अभंग
तुकाविप्र ऐसे | पूर्वार्चित गाढे | निरंतर वाढे | हरी गुरु कीर्तन
- ब्रम्हपुरी – जिल्हा सातारा
- नांदगाव – जिल्हा सातारा
- अंजनवती – जिल्हा बीड
- गोंदी – जिल्हा बीड
- पंढरपूर – जिल्हा सोलापूर

- भागवताच्या सर्व भागावर अभंगात्मक टीका शतकोटीचे अभंग ,
- तत्वमसि अभंगात्मक निरूपण
- सुदामचरित्र
- भानुदास चरित्र
- ज्ञानेश्वर चरित्र
- कालियामर्दन
- हरीपाठाचे अभंग
- पंढरीपर अभंग
- समाज प्रबोधनात्मक प्रासंगिक अभंग
- नरदेह महिमा अभंग
- कीर्तन महिमा सांगणारे अभंग
- इतर संतावरचे अभंग
- विठ्ठलावरील पोवाडा