कृष्णाकाठचा विठ्ठल

कृष्णाकाठचा विठ्ठल

 

वोवाळू आरती सावळ्या हरी | राम राजा विठो उभा कृष्णेच्या तिरी ॥

कृष्णा वेण्या तनु साऱ्या विश्वाच्या माता | ऐक्य भावे पुरी ब्रम्ह आलिया सरीता ॥

सरीता या मिळूनी पदी विष्णूच्या आल्या | नाथ शिव ऋषि सप्त पाहुनीया धाल्या ॥

वोवाळू आरती सावळ्या हरी | राम राजा विठो उभा कृष्णेच्या तिरी ||१||

 

धालेपण हे भाक मागितली देवा | येथे वसती करा माझ्या जीवीचीया जीवा ॥

जीवाची या जीवा भाक मागितली द्यावी | ब्रीदापायी देवा पतीत पावना पुरवावी ॥

वोवाळू आरती सावळ्या हरी | राम राजा विठो उभा कृष्णेच्या तिरी ||२||

 

पुरवी दिली भाक आली विठो येती जे | तुकाविप्र पुजी साधू संतांचे पाये ॥

तुकाविप्र पुजी साधू संतांचे पाये  | तुकाविप्र पुजी साधू संतांचे पाये ॥

वोवाळू आरती सावळ्या हरी | राम राजा विठो उभा कृष्णेच्या तिरी ||३||

Scroll to Top