रुक्मिणीची आरती
अनादि सिद्ध माय भुवन त्रय जननी | तुझेनी योगे देवा थोरी य तिन्ही ॥
आकाश पृथ्वी वायु जळदेव वन्ही | सर्व ही आले उदया तुझ्या कृपेने ॥
जय देवी जय देवी रुक्मिणी माते | वोवाळू आरती तुज सद्गुरू सुख भरिते ||१||
सर्वाधार माय तुझ्या कृपेचा | तुझ्या कृपे वेदा फुटली ही वाचा ॥
तेथे आंबे किती पाड आमुचा | घाली पान्हा आता पूर्ण कृपेचा ॥
जय देवी जय देवी रुक्मिणी माते | वोवाळू आरती तुज सद्गुरू सुख भरिते ||२||
तुकाविप्र दास अनादि गुरुमाय | कृपा करून दाखवी हीना तू पाय ॥
त्रीभुवन पालन करिसी बहु तुजला काय | विनंती करणे ऐसी भेटी तू देय ॥
जय देवी जय देवी रुक्मिणी माते | वोवाळू आरती तुज सद्गुरू सुख भरिते ||३||