कामधेनूची आरती
आरती कामधेनवे | सुरभिया वैष्णवे वोवाळू तुज प्रीती ॥
विश्वरूप नित्य नवे आरती कामधेनवे ||१||
प्रसन्न वेदमाय | होय विलंब काय गाजवी कीर्ती घोष ॥
हाची प्रसंग होये आरती कामधेनवे | सुरभिया वैष्णवे वोवाळू तुज प्रीती ॥
विश्वरूप नित्य नवे आरती कामधेनवे ||२||
प्रताप थोर गाजो | नाम सुरभिया साजो | मागणे तुज एक ॥
वर देई विजयी जे आरती कामधेनवे | सुरभिया वैष्णवे वोवाळू तुज प्रीती ॥
विश्वरूप नित्य नवे आरती कामधेनवे ||३||
विनंती सत्यपणे | द्यावे अभंग देणे प्रसिद्ध त्रिभुवनी कीर्ती होय ॥
तुझी जेणे आरती कामधेनवे | सुरभिया वैष्णवे वोवाळू तुज प्रीती ॥
विश्वरूप नित्य नवे आरती कामधेनवे ||४||
प्रमाण मागणे हे | तुकाविप्र नाम ध्येये उरवी सत्यपणे ॥
विनवणी सहजे आरती कामधेनवे | सुरभिया वैष्णवे वोवाळू तुज प्रीती ॥
विश्वरूप नित्य नवे आरती कामधेनवे आरती कामधेनवे ||५||