ओवाळू आरती कीर्तन रंगा। हरि कीर्तन रंगा । श्रोते वक्ते गुरुदेव संगा ||१||
नित्य नेम, कथा रंग ऐसा वाढत असो। सर्वकाळ प्रेमा अंगी कीर्तन वसो ॥
लोटांगण घालोनीया वंदिली पाये। संकीर्तनी रुप डोळे भरुनी पाहे ॥
ओवाळू आरती कीर्तन रंगा। हरि कीर्तन रंगा । श्रोते वक्ते गुरुदेव संगा || २ ||
अलींगला रंग प्रेमे कीर्तनी हरी । आनंदे पूजीले ज्यासी गर्जती चारी ॥
भावे ओवाळीली भक्ती कीर्तन सभा। तुकाविप्र हा नाचत उभा ॥
ओवाळू आरती कीर्तन रंगा। हरि कीर्तन रंगा । श्रोते वक्ते गुरुदेव संगा ||३||