आरती दत्ताची
आरती दत्त देवा ब्रम्हा विष्णु सदाशिवा ॥
त्रैमूर्ती गुरुराया | कृपा लोभ करावा ॥
आरती दत्त देवा ||१||
अभंग विनवणी | भावे जोडोनी पाणी ॥
केली हे परीसावी | कथा नाम रंगणी ॥
आरती दत्त देवा ||२||
सत्संग हरीकथा | नित्य नेम समर्था ॥
प्रमाण भेट तुझी | हेच पाहिजे आता ॥
आरती दत्त देवा ||३||
सद्गुरू दास आहे | केली विनंती पाहे ॥
प्रसिद्ध कृपा दृष्टी । तुका विप्र हेतू आहे ॥
आरती दत्त देवा आरती दत्त देवा ब्रम्हा विष्णु सदाशिवा ||४||