आरती वेद शास्त्रा | ग्रंथ वेदांत सारा ।।
जाणोनी वीचरती । तया आरती थोरा ||धृ||
प्रसंग नित्य पूजा। विप्र नामया ध्वजा ।।
भूभार हरणार्थ । साधू योगीराजा ||
दुर्बोध तीर्थे जाले । तैसे पायी दावीले ।।
दुर्गुण काये ते आता । गुण वेगळे केले ||
भूदेवा ज्ञान घना। तुकाविप्र प्रार्थना ।।
कीर्तन प्रेमरंग। तारु उघड जन ||