आरती चार वेदा । इये ग्रंथी संपदा ॥
येकाचे येकवट । विनवणी येकदा ||धृ||
अभंग हे ची भेटी । प्रीती सर्व या गोष्टी ॥
भूदेव संतराया। प्रेमे माहुली मिठी ||१||
सर्वार्थे उघडेची । घडी सत्ये सोन्याची ॥
नेमाची नित्य भेटी । लाभ अखंड हाची ||२||
कीर्तनी विप्र तुका । उभा येकला येका ॥
वेदांत सार तो हा । भक्ती भाव या लोका ||३ ||