संत पंगतीची आरती

आरते प्रेम आरती । विप्र संत पंगती ।।

वेदांत सिद्ध सर्वा । वोवाळणे हेत प्रीती ||धृ||

 

धन्य हे स्वामी सर्व। कली काळासी भाव ।।

लावोनी उद्धरीले । विप्रनाम भूदेवे ||१|| 

 

कृपाळू विप्रसंता । सर्व आरती आरता ।।

ऐसी हे कलीयुगी। केली सर्व कार्य सिद्धता ||२||

 

त्रिमुर्ती विप्र सर्वा । कृपा लोभ करावा ।।

आरती याच हेते। विप्र तुकीया सेवा ||३||

Scroll to Top